महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'लाल कप्तान'मधील सैफचा फर्स्ट लूक प्रदर्शित - first look

सैफ 'लाल कप्तान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंग करणार आहेत.

'लाल कप्तान'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

By

Published : May 20, 2019, 2:58 PM IST

मुंबई - अभिनेता सैफ अली खान काही दिवसांपूर्वीच 'बाजार' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. अशात आता सैफ पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला असून लवकरच तो 'लाल कप्तान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. यात सैफचा लूक पाहायला मिळत असून त्याचा हा आगळावेगळा अवतार प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचवणारा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवदीप सिंग करणार आहेत.

'लाल कप्तान'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

आनंद एल राय या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरसोबतच याची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details