हैदराबाद - अभिनेता सैफ अली खान आगामी 'आदिपुरुष' या रामायणावर आधारित चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात भगवान रामची भूमिका करणार्या प्रभाससोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सैफ उत्सुक झाला आहे. यापूर्वी चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल बोलल्याबद्दल वादात उअडकल्यानंतर सैफ अलीने आता चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी काही मनोरंजक माहिती दिली आहे.
२००६ मध्ये रिलीज झालेल्या 'ओमकारा' चित्रपटामध्ये लंगडा त्यागी ही खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर सैफ अलीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटात त्याने औरंगजेबचा रॉयल गार्ड उदयभानसिंग राठौर ही भूमिका साकारली होती. यात अजय देवगणने तान्हाजी मालुसरे ही व्यक्तीरेखा साकारली होती. आता आदिपुरुष या चित्रपटात तो पुन्हा एकदा खलनायक साकारणार आहे.
एका आभासी मुलाखीत बोलताना सैफ म्हणाला,"मी जितका आहे त्याहून अफाट दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यात काही ट्रिकचा वापर ते करणार आहेत. दृष्ये खरी वाटावीत यासाठी ते आमचे प्रशिक्षण करणार आहेत. या सर्व गोष्टी सामान्य आहेत परंतु ती मुख्य गोष्ट नाही."