मुंबई- अभिनेता सैफ अली खान आगामी वेब सिरीज 'तांडव'मध्ये आपल्या शाही असण्याचा आनंद लुटताना दिसणार आहे. याशिवाय राजकीय नाट्य असलेल्या त्याच्या भूमिकेबरोबरच त्याच्या चाहत्यांसाठी या मालिकेत आणखी एक आकर्षण आहे, कारण हरियाणामधील त्याच्या वडिलोपार्जित पतौडी पॅलेसमध्ये सैफचे अनेक सीन शूट झाले आहेत.
अली अब्बास जफरच्या 'तांडव' या वेब सिरीजमध्ये छोटे नवाब एक मुरलेला राजकारणी समर प्रताप सिंह ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. पतौडी पॅलेसमध्ये मालिकेच्या चित्रीकरणाबद्दल बोलताना सैफ अली खानने एका वेबलोइडला सांगितले की त्याने निर्मात्यांना त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेत शूट करण्याची परवानगी देऊन एक अपवाद केला आहे.
"मला वाटते की हा राजवाडा आपल्याला रॉयल लुक देईल. तिथे उभे असलेले कोणीही रॉयल दिसायला लागेल. कधीकधी तो शूटसाठी देण्यास हरकत नाही, कारण वर्षातील ३४० दिवस हा पॅलेस वापरात नसतो, "असे सैफ म्हणाला.
शुटिंग क्रू जर पॅलेसच्या बाहेर शुटिंग करणार असेल तर हरकत नव्हती पण तांडव ही मालिका याला अपवाद ठरली, असे सैफ म्हणाला.