मुंबई - सैफ अली खानचा मुलगी सारा अली खाननंतर आता मुलगा इब्राहिमही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ही गोष्ट दुसऱ्या कुणी नाही तर स्वतः सैफ अलीने सांगितली आहे. एका वृत्तानुसार, सैफ म्हणाला, "इब्राहिम अभिनय कारकिर्दीसाठी तयार दिसत आहे आणि का नाही? मला माझ्या सर्व मुलांना या व्यवसायात पाहायला आवडेल. येथे काम करणे चांगले."
मुलाखतीत तो म्हणाला, "मला आठवतंय, की मी १७-१८ वर्षांच्या वयात गोंधळात पडलो होतो. अभिनयामुळे मी संपवण्यापासून वाचलो होतो. काम हाती असण्याने ओळख निर्माण झाल्याने मला कामाचे समाधान मिळाले आणि मला ते सर्व मिळाले जे मला हवे होते.''