महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'विक्रम वेधा' चित्रपटातील सैफ अली खानचा 'विक्रम' फर्स्ट लूक रिलीज - हिंदी रिमेक विक्रम वेधा

'विक्रम वेधा' चित्रपटातील सैफ अली खानचा 'विक्रम' लूक खूपच दमदार दिसत आहे. सैफ अली खान विक्रम लूकमध्ये गुलाबी टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये देखणा दिसत आहे. वेधा या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हृतिक रोशननेही सैफचा लूक त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

सैफ अली खान
सैफ अली खान

By

Published : Feb 24, 2022, 12:56 PM IST

मुंबई -हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'विक्रम वेधा' या चित्रपटातील सैफच्या 'विक्रम' या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक 24 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. या चित्रपटात हृतिक रोशन 'वेधा'ची भूमिका साकारत आहे. 'विक्रम वेधा' हा चित्रपट दक्षिणेतील अभिनेता विजय सुतेपती स्टारर तमिळ चित्रपट 'विक्रम वेधा'चा हिंदी रिमेक आहे. 30 सप्टेंबरला हृतिक-सैफचा 'विक्रम वेधा' सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सैफचा विक्रम फर्स्ट लुक

सैफ अली खानचा 'विक्रम'चा लूक खूपच दमदार दिसत आहे. सैफ अली खान विक्रम लूकमध्ये गुलाबी टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये देखणा दिसत आहे. वेधा या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हृतिक रोशननेही सैफचा लूक त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

याआधी चित्रपट निर्मात्यांनी हृतिक रोशनच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त चित्रपटातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक देखील रिलीज केला होता. या चित्रपटात हृतिक गँगस्टर वेधाची भूमिका साकारणार आहे.

'वेधा'चा लूक रिलीज करताना चित्रपट निर्माता कंपनी 'T-Series' ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले होते की, "ऋतिक रोशनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, विक्रम वेधमध्ये वेधाचा फर्स्ट लूक रिलीज करताना आम्हाला आनंद होत आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपट जगभरातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे."

विक्रम आणि बेताल या भारतीय लोककथेवर आधारित हा चित्रपट गुंड वेधाला पकडून मारणाऱ्या विक्रम या कठोर पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. या चित्रपटात सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'विक्रम वेधा' हा त्याच नावाच्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी तमिळ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हे त्याच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शक आहेत. याची निर्मिती एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी केली आहे.

हेही वाचा -Farhan Shibani Wedding : फरहान अख्तरच्या मुलींनी केला शिबानी दांडेकरसोबत डान्स

ABOUT THE AUTHOR

...view details