मुंबई - अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एका चित्रपटात झळकणार आहेत. याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. रमेश तौराणी आणि अक्षय पुरी यांची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटात दोघेही स्क्रिन स्पेस शेअर करणार आहेत.
'भूत पोलीस' चित्रपटात सैफ आणि अर्जुन कपूर पहिल्यांदाच एकत्र - पवन कृपलानी
दिग्दर्शन पवन कृपलानी यांच्या आगामी भूत पोलीस चित्रपटात सैफ आणि अर्जुन कपूर एकत्र काम करणार आहेत. ही माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली आहे.
सैफ आणि अर्जुन कपूर
सैफ आणि अर्जुन कपूर यांच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक आहे भूत पोलीस. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग २०२० च्या वर्षा अखेरीस सुरू होईल. २०२१ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो.
भूत पोलीस चित्रपटा सैफ आणि अर्जुन कपूर एकत्र काम करणार असल्याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट असल्याचे त्यांनी लिहिलंय.