मुंबई - अभिनेता साहिल खान याने एन. चंद्रा यांच्या २००१ मध्ये आलेल्या 'स्टाईल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर साहिल खानने काही चकित करणारे खुलासे केले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर प्रसिध्द मॅगझिन स्टारडस्टचे कव्हर पेज शेअर केले आहे. यावर साहिल खानसह सलमान आणि शाहरुख खान दिसत आहेत.
साहिलने स्वतःच्या करियरच्या बाबतीत काय घडले याचा खुलासा करताना लिहिलंय, ''फार कमी लोकांच्या आयुष्यात असे घडते की, 'स्टाईल'सारख्या सिनेमात काम केल्यानंतर भारताच्या सर्वश्रेष्ठ मॅगझिनच्या कव्हरवर सलमान आणि शाहरुख खान या देशाच्या टॉपच्या सुपर्टारसोबत तुम्ही असता. मात्र यातील एका सुपरस्टारला फार वाईट वाटले. खरंतर मी नवखा होता. त्याचा फॅन होतो, कमजोर होतो. तरीही ते मला साईड रोलसाठी बोलवत राहिले, टीव्ही शोसाठी बोलवत राहिले आणि अनेक सिनेमातून मला काढून टाकले. नाव मोठे आणि लक्षण खोटे. ओळखा पाहू कोण?''