मुंबई - सडक २ च्या निर्मात्यांनी बुधवारी अधिकृत ट्रेलर रिलीज केला. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 21 वर्षानंतर या चित्रपटाद्वारे महेश दिग्दर्शनाकडे परत आले आहेत.
ट्रेलरमध्ये संजय, आलिया आणि आदित्य यांनी चित्रपटात साकारलेल्या व्याक्तीरेखांची ओळख करुन देण्यात आली आहे. पूजा भट्टच्या पोर्टेटशी संजय दत्त संवाद साधताना पाहायला मिळतो. मकरंद देशपांडे एक नव्या अवतारात यात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग;उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता
सडक 2 चा ट्रेलर रिलीज होत असतानाच संजय दत्तच्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान झाले आहे. त्यामुळे तो पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर स्टार किड्सवर अनेक आरोप होत आहेत. महेश भट्टांच्यांवरही आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रेलरला अपेक्षित प्रतिसाद दिसत नाही.
हा चित्रपट ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील डिस्ने प्लस हॉटस्टार २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.