मुंबई - नागरिकता संशोधन कायद्याच्या मुद्द्यावरुन देशभर अनेक ठिकाणी विरोधी आंदोलन सुरू झाले आहे. यासंबंधी अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशात सिने आणि टीव्ही जगतातूनही प्रतिक्रिया येणे सुरूच आहे. बॉलिवूड फिल्म्स आणि अलिकडेच गाजलेल्या सेक्रेड गेम्सचे दिग्दर्शक नीरज घेवान यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नीरज यांनी म्हटले आहे की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे सपशेल आर्टिकल १४ चे उल्लंघन आहे.
नागरिकता संशोधन कायदा आर्टिकल 14 चे उल्लंघन आहे, बॉलिवूड दिग्दर्शकाने केले ट्विट - Neeraj Ghaywan latest news
बॉलिवूड फिल्म्स आणि सेक्रेड गेम्सचे दिग्दर्शक नीरज घेवान यांनी ट्विटरवर नागरिकता संशोधन कायदा संबंधी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नीरज यांनी म्हटले आहे की हे सपशेल आर्टिकल १४ चे उल्लंघन आहे.
![नागरिकता संशोधन कायदा आर्टिकल 14 चे उल्लंघन आहे, बॉलिवूड दिग्दर्शकाने केले ट्विट Neeraj Ghaywan reaction on CAB act](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5376266-thumbnail-3x2-ll.jpg)
नीरज यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले आहे, भारताच्या घटनेतील कलम १४ नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीला कायद्यानुसार समानता किंवा भारतातील कोणत्याही विभागात समान संरक्षण नाकारु शकत नाही. नागरिकता संशोधन कायदा कलम १४ चे उल्लंघन आहे.
नागरिकता संशोधन विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्यानंतर कायदा संमत झाला आहे. या कायद्याच्या विरोधात पूर्वेत्तर राज्यांमध्ये तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. हा कायदा तत्काळ रद्द करावा, असे आंदोलकांचे मत आहे. नागरिकता संशोधन कायद्याचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.