मुंबई- तुषार हिरानंदानीद्वारा दिग्दर्शित 'सांड की आँख' चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे. या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या दिवळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.
'सांड की आँख'चं चित्रीकरण पूर्ण, दिवाळीत होणार प्रदर्शित - bhumi pednekar
हा चित्रपट जगातील दोन वयस्कर शार्पशूटर महिलांवर आधारित असणार असून तापसी आणि भूमी या महिलांची भूमिका साकारत आहेत.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या सेटवरील संपूर्ण टीमचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. हा चित्रपट जगातील दोन वयस्कर शार्पशूटर महिलांवर आधारित असणार असून तापसी आणि भूमी या महिलांची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होताच तापसी आणि भूमीनेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सेटवरील काही आठवणी शेअर करत भावनिक कॅप्शन दिले आहे.
तापसीने या चित्रपटात प्रकाशी तोमर हे पात्र साकारलं आहे. तोमरजी तुमचं हे पात्र नेहमी माझ्यात जिवंत राहिलं असं तापसीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर भूमीनेही काही ठिकाणांहून निरोप घेणे खूप कठीण असल्याचे म्हणत फोटो शेअर केला आहे. अनुराग कश्यप आणि निधी परमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.