महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रदर्शनापूर्वीच देशभरात ट्रेंड होतोय 'साहो'चा ट्रेलर

भारतातील सध्याच्या ट्विटर ट्रेंडमध्ये हा सिनेमा अव्वल स्थानी आहे. यावरूनच या सिनेमाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. सुजित यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

By

Published : Aug 10, 2019, 6:12 PM IST

प्रदर्शनापूर्वीच देशभरात ट्रेंड होतोय 'साहो'चा ट्रेलर

मुंबई- दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूडची 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत असतानाचा हा ट्रेलर प्रदर्शनाआधीच ट्विटरवर ट्रेंड होताना दिसत आहे.

भारतातील सध्याच्या ट्विटर ट्रेंडमध्ये हा सिनेमा अव्वल स्थानी आहे. यावरूनच या सिनेमाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. सुजित यांचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्ल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान या ट्रेलर लॉन्च इव्हेंटदरम्यानचे श्रद्धा कपूरचे फोटोही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details