मुंबई- अभिनेता प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'साहो' चित्रपटाच्या ट्रेलरची चाहत्यांना आतुरता आहे. या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून चाहते ट्रेलरसाठी उत्सुक होते. अशात आता या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे.
VIDEO: 'साहो' रे 'बाहुबली', श्रद्धा-प्रभासच्या बहुप्रतीक्षित 'साहो'चा ट्रेलर प्रदर्शित - साहो हिंदी ट्रेलर
ट्रेलरमध्ये प्रभास आणि श्रद्धाच्या जबरदस्त अॅक्शन आणि थरारक स्टंटसोबतच रोमॅन्सची झलक पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे.
ट्रेलरमध्ये प्रभास आणि श्रद्धाच्या जबरदस्त अॅक्शन आणि थरारक स्टंटसोबतच रोमॅन्सची झलक पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या अर्ध्या तासातच चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रेक्षकांची या ट्रेलरला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.
या चित्रपटात नील नितिन मुकेश, चंकी पांडे आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका असून या कलाकारांची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सुजित यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या ३० ऑगस्टला हिंदीसह तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रेक्षकांना भेटीला येणार आहे.