मुंबई - अभिनेता प्रभासच्या आगामी 'साहो' चित्रपटाबद्दलची उत्कंठा गेली दोन वर्षे ताणली गेली आहे. 'बाहुबली' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर प्रभास 'साहो' चित्रपटासाठी घाम गाळत आहे. या चित्रपटील एका फाईट सीनसाठी तब्बल ७० कोटी खर्च झाला आहे.
'साहो' चित्रपटाचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला होता. यातील दृष्ये पाहिल्यानंतर चित्रपट बिग बजेट आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अत्यंत वेगवान दृष्ये, नेत्रदिपक स्टंट्स आणि जबरदस्त अॅक्शन यामुळे साहो चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
'साहो' चित्रपटातील हा अॅक्शन सीक्वेन्स अबू धाबीमध्ये शूट करण्यात आलाय. यात केवळ प्रभास नाही तर अभिनेत्री श्रध्दा कपूरही स्टंट करताना दिसत आहे.
या चित्रपटातील साहसी दृष्ये आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर केनी बेट्स यांनी बसवली आहेत. ही दृष्ये डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आर. माधी यांनी आपल्या सृजनशील आणि कलात्मक नजरेतून जीवंत केली आहेत. विख्यात संकलक श्रीकर प्रसाद यांनी याचे संकलन केले असून साबू सायरिल यांनी प्रॉडक्शन डिझाईन केले आहे.
'साहो' चित्रपटात जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होईल.