महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'साहो'सोबतचा क्लॅश टाळण्यासाठी 'छिछोरे'ची रिलीज डेट बदलली, या दिवशी होणार रिलीज - उत्कंठा

हा सिनेमा ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, ऐनवेळी श्रद्धा आणि प्रभासच्या 'साहो' चित्रपटाची रिलीज डेट बदलून ती ३० ऑगस्ट करण्यात आली. याच कारणामुळे या बिग बजेट आणि बहुचर्चित सिनेमासोबतचा क्लॅश टाळण्यासाठी नितेश तिवारी यांनी 'छिछोरे'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला

'छिछोरे'ची रिलीज डेट बदलली

By

Published : Aug 5, 2019, 8:07 AM IST

मुंबई- नितेश तिवारी यांचं दिग्दर्शन असलेल्या 'छिछोरे' चित्रपटाचा ट्रेलर रविवारी प्रदर्शित झाला. होस्टेल लाईफपासून सुरू झालेली आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणार सोबत असणारी मैत्री आणि या दरम्यान होणारे अनेक विनोद ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले. या ट्रेलरनं चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवलेली असतानाच आता चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.

हा सिनेमा ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, ऐनवेळी श्रद्धा आणि प्रभासच्या 'साहो' चित्रपटाची रिलीज डेट बदलून ती ३० ऑगस्ट करण्यात आली. याच कारणामुळे या बिग बजेट आणि बहुचर्चित सिनेमासोबतचा क्लॅश टाळण्यासाठी नितेश तिवारी यांनी 'छिछोरे'च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.

श्रद्धा आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मुख्य भूमिका असलेला 'छिछोरे' सिनेमा आता ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी आता प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. तर 'साहो' चित्रपट प्रेक्षकांना ३० ऑगस्टलाच पाहायला मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details