महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कथित 'लव्हबर्ड्स' हृतिक - सबा आझादने एकत्र घालवला रविवार - पाहा फोटो - गर्लफ्रेंड सबा आझादसोबत ह्रतिक

शनिवारी मित्र फरहान अख्तरच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर, हृतिक रोशनने त्याच्या कुटुंबासाठी आणि प्रेमिका सबा आझादसाठी काही वेळ काढला. या जोडप्याने त्यांच्या कथित प्रणयावर मौन बाळगले असतानाही ह्रतिक रोशनने सबासोबतच्या त्याच्या नातेसंबंधाला मान्यता दिली असल्याचे दिसत आहे. कारण दोघांनीही रविवार एकत्र घालवला आणि कौटुंबीक फोटोसाठी पोजही दिली.

हृतिक - सबा आझाद
हृतिक - सबा आझाद

By

Published : Feb 21, 2022, 1:05 PM IST

मुंबई- बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन अभिनेत्री व संगीतकार सबा आझादला डेट करत असल्याची सध्या चर्चा आहे. रविवारी कथित जोडप्याने बाहेर वेळ न घालवता घरातच रहाणे पसंत केले. रोशन कुटुंबीयांसोबत सबा आझाद मजेत राहिली. एका आनंदी ग्रुप फोटोत ह्रतिकसह सबा आणि रोशन कुटुंबाचे सदस्य दिसत आहे.

शनिवारी मित्र फरहान अख्तरच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर हृतिकने त्याच्या कुटुंबासाठी आणि प्रेयसी सबासाठी काही वेळ काढला. या जोडप्याने त्यांच्या कथित प्रणयावर मौन बाळगले असतानाही ह्रतिक रोशनने सबासोबतच्या त्याच्या नातेसंबंधाला मान्यता दिली असल्याचे दिसत आहे.

रविवारी हृतिकने त्याचे काका आणि संगीतकार राजेश रोशन यांची भेट घेतली. या अभिनेत्यासोबत त्याची आई पिंकी रोशन आणि त्यांची मुले हृहान आणि हृधन होते. रविवारचा दिवस संपूर्ण कुटुंबासाठी दिलेल्या ह्रतिकच्यासोबत सबा आझाद एक खास पाहुणी म्हणून आली होती.

फॅम-जॅमची एक झलक शेअर करताना राजेश रोशनने इंस्टाग्रामवर लिहिले: "आनंद नेहमीच आसपास असतो... रविवारी, विशेषत: जेवणाच्या वेळी." हृतिकने या पोस्टवर कमेंटमध्ये लिहिले,: "हाहाहा खरे आहे चाचा! आणि तुम्ही सर्वात मजेदार आहात."यावर सबा आझादनेही प्रतिक्रिया देताना लिहिले, "सर्वोत्तम संडे."

गेल्या महिन्यात डिनर डेटनंतर हे जोडपे पहिल्यांदाच एकत्र दिसल्यानंतर हृतिक आणि सबाच्या डेटिंगच्या अफवा पसरू लागल्या. हे जोडपे फक्त दोनदा एकत्र दिसले पण त्यांचा गुपचुप रोमान्स मनोरंजन जगतात गॉसिपचा विषय बनला आहे.

हेही वाचा -'गहराइयाँ' सक्सेस पार्टीमध्ये दीपिका पदुकोण आणि अनन्या पांडे

ABOUT THE AUTHOR

...view details