महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एस एस राजामौलीच्या चित्रपटातून आलिया भट्टला वगळले, जागा घेणार प्रियंका चोप्रा? - आलियाच्या जागी ग्लोबल आयकॉन असलेल्या प्रयंका चोप्राला

आलिया भट्ट हिला एस एस राजामौलीच्या महत्वाकांक्षी 'आरआरआर' चित्रपटामधून वगळण्यात आलेले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणार्‍या प्रतिक्रियेनंतर आलियाच्या जागी ग्लोबल आयकॉन असलेल्या प्रयंका चोप्राला चित्रपटात घेण्याचा विचार केला आहे.

replaces Alia Bhatt with Priyanka Chopr
'आलिया भट्ट'ला वगळले, जागा घेणार प्रियंका चोप्रा

By

Published : Aug 25, 2020, 4:58 PM IST

मुंबईः अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर आलिया भट्ट सोशल मीडियावर जोरार ट्रोल होत आहे. अशात तिच्या सडक २ या चित्रपटाची निगेटिव्ह पब्लिसीटी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ती चित्रपटात असण्याचा त्रास चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये होऊ शकतो, असा विचार करुन एसएस राजामौलीच्या पुढील आरआरआर चित्रपटातून आलियाला वगळण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे.

एका आघाडीच्या दैनिकाच्या अहवालानुसार, आरआरआरची टीम आलियाला वगळण्याचा विचार करीत असून तिच्या जागी प्रियंका चोप्राची वर्णी लागणार आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीचा आरोप आलियावर केला जात आहे. त्यामुळे तिचा द्वेष करणारी मोहिमच सोशल मीडियावर सुरू आहे.

आलिया राजामौलीच्या चित्रपटाचा भाग नसल्याची ही बातमी पहिल्यांदाच झळकलेली नाही. चित्रपटात तिची भूमिका छोटी असल्यामुळे ती हा सिनेमा करणार नसल्याच्या बातम्या यापूर्वी झळकल्या होत्या. मात्र नंतर आलियाने या बातमीचे खंडन केले होते.

मे महिन्यामध्ये आरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आलियाची निवड परफेक्ट असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा - सुशांतला विषबाधा झाली होती अन् शवविच्छेदनास मुद्दाम लावला विलंब, सुब्रमण्यण स्वामींचा आरोप

बॉलिवूड स्टार अजय देवगण यांच्यासह आरआरआर या चित्रपटात मुख्य भूमिकेत राम चरण आणि जूनियर एनटीआर आहेत. या चित्रपटात रे स्टिव्हनसन, अ‍ॅलिसन डूडी आणि सामुथीराकणी हे आंतरराष्ट्रीय कलाकारदेखील आहेत.

हा पीरियड ड्रामा असलेला चित्रपट असून तेलुगू स्वातंत्र्यसैनिक, अलोरी सीथाराम राजू आणि कोमारम भीम यांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. अंदाजे ४५० कोटींच्या बजेटवर तयार होणमारा आरआरआर चित्रपट पूर्वी जानेवारी, २०२१ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार होता. तथापि, कोविड -१९ च्या प्रसारामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले असल्याने निर्माते प्रदर्शनाची अजून एक तारीख शोधत आहेत.

दरम्यान, आलिया भट्टचा 'सडक 2' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यास सज्ज आहे. या अभिनेत्रीकडे संजय लीला भन्साळीचा 'गंगूबाई काठियावाडी' आणि करण जोहरचा 'तख्त' हे दोन चित्रपट आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details