महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 6, 2020, 7:10 PM IST

ETV Bharat / sitara

'आरआरआर' टीमने सुरू केले शूटिंग, दिग्दर्शक राजामौली यांनी शेअर केला व्हिडीओ

बहुचर्चित आरआरआर चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरूवात झाली आहे. ५ ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये दिग्दर्शक राजामौली यांनी शूटिंग पुन्हा सुरू करीत असल्याचे सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

RRR shoot resumes
'आरआरआर' टीमने सुरू केले शूटिंग

मुंबई- कोरोना संकटामुळे शूटिंग थांबवण्यात आल्यानंतर बहुचर्चित आरआरआर चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरूवात झाली आहे. ५ ऑक्टोबरपासून हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

याबद्दल दिग्दर्शक राजामौली यांनी म्हटलंय, ''हा मोठी ब्रेक होता आणि हा काळ सिनेमा अधिक चांगला बनवण्यासाठी उपयुक्त ठरला. पूर्ण टीम पुन्हा परतण्यासाठी सज्ज झाली. पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करीत आहोत. मी प्रेक्षकांना चित्रपट दाखवण्याची प्रतीक्षा करीत आहे. या कठिण काळात त्यांचा पाठिंबा अविश्वसनीय होता आणि संपूर्ण टीमच्या समर्थनासाठी आभारी आहे.''

शूटिंगसाठी सुरुवात केल्यानंतर आता टीमने एनटीआर भीम या व्यक्तीरेखेच्या लूक रिलीजची तयारी सुरू केली आहे. खूप काळापासून हा लूक रिलीज करणे प्रलंबीत आहे. २२ ऑक्टोबरला हा लूक प्रसिद्ध होईल. राम चरण याच्या रामा राजू या व्यक्तीरेखेचा लूक लोकांना प्रचंड आवडला होता.

एसएस राजामौली यांचे दिग्दर्शन असलेला आरआरआर हा चित्रपट डीवीवी दानय्या निर्मित असून त्यांच्या डीवीवी एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली बनत आहे. या चित्रपटात एनटीआर, राम चरण, अजय देवगन, आलिया भट्ट, ओलिविया मॉरिसलह अनेक दिग्गज कलाकार काम करीत आहेत.

ही एक काल्पनिक कथा असून ती स्वतंत्र्य सेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या भोवती गुंफली आहे. ज्यांनी ब्रिटिश आणि हैदराबादचा निजाम यांच्या विरुद्ध लढाई लढली होती. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मळयालम आणि कन्नड भाषेत रिलीज केला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details