महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आरआरआर : रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे क्लयमॅक्सचे शूटिंग - बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौली

एस एस राजामौली यांच्या कल्पित बहुचर्चित चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी राम चरण आणि जूनियर एनटीआर हे कठोर सराव करीत आहेत.

RRR
आरआरआर

By

Published : Feb 5, 2021, 7:32 PM IST

हैदराबाद - बाहुबली फेम दिग्दर्शक एस एस राजामौलीचा महत्वाकांक्षी चित्रपट आरआरआर रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंगच्या अंतिम टप्प्यात आहे. अंतिम शेड्यूलची झलक दाखवत निर्मात्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात चित्रपटाचे आघाडीचे नायक राम चरण आणि जूनियर एनटीआर आरआरआरच्या क्लायमॅक्स शूटसाठी जोरदार सराव सत्रांच्या दरम्यान दिसत आहेत.

चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर निर्मात्यांनी चरण आणि जूनियर एनटीआरची दोन फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, "द क्लाइमॅक्ससाठी जोरदार सराव सत्राच्या मध्यभागी!"

या टीमने १९ जानेवारीपासून आरआरआरच्या भव्य क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू केले होते. बहुप्रतिक्षित आरआरआर चित्रपटात बॉलिवूडच्या आलिया भट्ट आणि अजय देवगण यांचाही समावेश आहे.

ही एक काल्पनिक कथा असून ती स्वातंत्र्यसेनानी अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या भोवती गुंफली आहे. ज्यांनी ब्रिटिश आणि हैदराबादचा निजाम यांच्याविरुद्ध लढाई लढली होती. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत १३ ऑक्टोबरला रिलीज केला जाणार आहे.

हेही वाचा - दिनेश विजानच्या 'दसवी'मध्ये अभिषेक साकारणार 'दहावी फेल' मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details