हैदराबाद: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची डेटींग सतत चर्चेत असते. मात्र, आपापल्या चित्रपटांमध्ये व्यग्र असल्यामुळे दोघेही क्वचितच भेटतात. पण तुम्हाला माहित आहे की आलिया भट्ट नेहमी रणबीर कपूरसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असते आणि RRR या चित्रपटातील तिचा को-स्टार Jr NTR ने आलियाचा पर्दाफाश केला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने हा किस्सा सांगितला.
@hereforaliaabhatt नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आरआरआर चित्रपटाची स्टारकास्ट, राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट स्टेजवर बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये करण जोहर देखील दिसत आहे. फोनवर सर्वात बिझी कोण असते असा प्रश्न तिघांना विचारतो. याला उत्तर देताना ज्युनियर एनटीआर म्हणतो की आलिया भट्ट नेहमी फोनवर असते, व्हिडिओ कॉलवर बोलत असते. कारण ते दोघे लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. हो बोलताना ज्युनियर एनटीआरचा इशारा रणबीर कपूरकडे होता हे स्पष्ट आहे.
ज्युनियर एनटीआरच्या म्हणण्यानुसार, कारमध्ये बसून आलिया व्हिडिओ कॉलवर बोलत राहते. यानंतर अभिनेत्रीने ज्युनियर एनटीआरचे तोंड हाताने बंद केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आरआरआर फिल्ममेकरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचा आहे.