मुंबई - ह्रतिक रोशची बहिण सुनैना रोशन हिचा रोशन कुटुंबीय छळ करत असल्याचा आरोप कंगना रानावतची बहिण रंगोली चंडेलने केला होता. सुनैनाचा प्रियकर मुस्लिम असल्यामुळे तिला त्रास देण्यात येतो, असा दावा रंगोलीने कला होता. मात्र यात फार तथ्य नसल्याचे रोशन परिवाराशी संबंधित सुत्राने सांगितले आहे.
यामुळे सुनैनाला ठेवलंय रोशन कुटुंबीयांनी प्रियकरापासून लांब - Hritik Roshan
सुनैना रोशनचे मुस्लिम व्यक्तीसोबत प्रेम असल्यामुळे रोशन कुटुंबिय तिच्यावर दबाव आणत असल्याचा खुलासा कंगना रानावतची बहिण रंगोलीने केला होता. मात्र त्या व्यक्तीचा विवाह झाला असून त्याला मुलेही असल्याचे रोशन कुटुंबियांशी संबंधित सुत्राने सांगितले आहे.

फोटो रुहेल अमीन यांच्या इन्स्टाग्रामच्या सौजन्याने
सुनैना ज्या व्यक्तीसोबत प्रेम करते तो रुहेल अमीन हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. त्यामुळे सुनैनाच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी वाढू शकतात. म्हणून या लग्नाला रोशन कुटुंबीयांची संमती नसल्याचे सुत्रांकडून समजते.
सुनैना ही कंगना रानावतच्या संपर्कात असून ती आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा रोज वाचत असल्याचे रंगोलीने ट्विटवर म्हटले होते. सुनैनाही ट्विट करीत आपला कंगनाला पाठिंबा असल्याचे सांगत आपण नरक यातना भोगत असल्याचे म्हटले होते.