मुंबई- जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रुही' चित्रपटाने मॅडॉक फिल्म्सचा हॉरर-कॉमेडीचा वारसा एका पाऊल पुढे टाकत जपल्याचे दिसत आहे. दिग्दर्शक दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी विषयावर पकड ठेवत भय आणि कॉमेडी यांची उत्तम केमेस्ट्री जमवली आहे.
'रुही' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जान्हवी कपूरने लग्नासाठी तळमळत असलेल्या परंतु आत्म्याने झपाटलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या सीओव्हीडी -१९ सेफ्टी प्रोटोकॉल नियमांचे पालन करून ११ मार्चपासून देशभरातील सिनेमा हॉलमध्ये रिलीज होणार आहे.