महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सुश्मिता सेनसोबत लग्न करण्याच्या प्लॅनिंगबाबत बोलला रोहमन शाल - रोहमन शाल

मॉडेल रोहमन शाल आणि सुष्मिता सेन गेल्या दोन वर्षांपासून गंभीरपणे रिलेशनमध्ये आहेत. आपल्या नात्याबद्दल बोलताना रोहमन म्हणाला की, सुश्मिता सेन आणि तिच्या मुलींमध्ये त्याचे आधीच एक कुटुंब आहे आणि त्यामुळे लग्न करून त्याला अधिकृत करण्याची गरज त्यांना कधीच वाटली नाही.

Rohman Shawl and Sushmita Sen.
रोहमन शाल आणि सुष्मिता सेन

By

Published : Feb 6, 2021, 5:39 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा प्रियकर रोहमन शाल यांनी आपलं नातं मीडिया आणि लोकांच्या डोळ्यापासून कधीच लपवलं नाही. आपल्या नात्याबद्दल बोलताना रोहमन म्हणाला की, सुश्मिता सेन आणि तिच्या मुलींमध्ये त्याचे आधीच एक कुटुंब आहे आणि त्यामुळे लग्न करून त्याला अधिकृत करण्याची गरज त्यांना कधीच वाटली नाही.

अलीकडेच पेपॉनच्या नवीन गाण्यातील 'मौला'मध्ये अभिनय केलेल्या रोहमानने म्हटले आहे की, सुरुवातीलाच तो स्टार बनू इच्छित होता. पण सुष्मिताला भेटल्यानंतर आणि आयुष्यासाठी ज्या मेहनतीची आवश्यकता आहे त्या पाहिल्यानंतर जीवनाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन बदलला. एका अग्रगण्य दैनिकाशी बोलताना, शालने याचाही खुलासा केलाय की, जेव्हा त्याला मॉडेलिंगचा आनंद मिळणार नाही तेव्हा शेवटी तो व्यवसायात प्रवेश करेल.

लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारले असता रोहमन म्हणाला की लग्नासाठी कोणत्याही बाजूने कौटुंबिक दबाव नाही.

"माझे वडील, आई आणि बहीण माझे बिनशर्त समर्थन करतात. खरं तर जेव्हा मी सुष्मिताला डेट करण्यास सुरुवात केली, तेव्हा मी त्यांना याबद्दल सांगितले नाही. जेव्हा आमची छायाचित्रे माध्यमांमधून समोर आली तेव्हा त्यांना याबद्दल माहिती मिळाली. सुष्मिता आणि मला यापूर्वी खात्री असणे आवश्यक होते. आमचं नातं सार्वजनिक बनत आहे. तिने मला हे समजवून दिलं की, एकदा ती जीवनात येईल तेव्हा माझे जीवन बदलेल. मी तिच्या निर्णयाचा आदर केला आणि आम्ही तयार होईपर्यंत कोणालाही काही सांगितले नाही. माझे कुटुंब खूप समजूतदार आहे, आणि त्यांनी आमचे सर्व निर्णयाला पाठीशी घातले आहे. काहीही करण्याचा दबाव नाही, " असे रोहमन म्हणाला.

रोहमन पुढे म्हणाला, "सुष्मिता, तिच्या मुली (रेनी आणि अलिसा) आणि मी आधीच एक कुटुंब आहे. कधीकधी मी मुलींच्या वडिलांसारखा असतो, कधीकधी मी त्यांचा मित्र होतो आणि कधीकधी आम्हीही भांडतो. आम्ही एका सामान्य कुटूंबाप्रमाणेच जीवन जगतो आणि आनंद घेतो, म्हणूनच 'आप शादी कब कर रहे हो' या प्रश्नांवर लक्ष देत नाही. लग्न झाल्यावर आपण ते लपवणार नाही. आत्ता तरी आम्ही तिच्या वेब सिरीजच्या यशाचा आनंद घेत आहोत.तिच्या वेब सिरीजची. आगे सोचेंगे क्या होता है."

सुश्मिता आणि रोहमन शाल गेली दोन वर्षापासून डेट करीत आहेत. बऱ्याचवेळा ते रोमँटिक पोस्टमधून एकमेकांबद्दल लिहित असतात.

हेही वाचा - 'शार्दुल’ आणि ‘सुमी’ ला नेहमीच इच्छा होती चित्रपटातून एकत्र काम करण्याची!

ABOUT THE AUTHOR

...view details