महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'खतरों के खिलाडी'चे मानधन सिने कर्मचाऱ्यांना देणार रोहित शेट्टी

चित्रपट निर्माता रोहित शेट्टी कोरोना साथीच्या काळात सिनेमातील कामगारांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत सिनेमातील कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सध्याच्या 'खतरों के खिलाडी' या विशेष शोमधून मिळालेल्या मोबदल्याचा काही भाग वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

By

Published : Aug 6, 2020, 4:15 PM IST

Rohit Shetty t
रोहित शेट्टी

मुंबई - बॉलिवूडमधील सिने कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी चित्रपट निर्माते रोहित शेट्टी जोरदार तयारी करत आहेत. खतरों के खिलाडीसारखा शो होस्ट करणाऱ्या चित्रपट निर्माते दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी ज्युनियर कलाकार, पार्श्वभूमी नर्तक, स्टंटमॅन, लाइटमेन आणि इतर कामगारांना पाठिंबा देण्यासाठी सध्या प्रसारित होत असलेल्या अ‍ॅडव्हेंचर रियलिटी टीव्ही शोच्या मानधनातील पैसे देण्याचा निर्णय घेतलाय. या कामगारांच्या बँक खात्यात तो थेट रक्कम भरणार आहे.

रविवारीपासून त्याच्या खतरों के खिलाडी : मेड इन इंडिया या विशेष भागांचे शूटिंग सुरू झाले आहे. यापूर्वीच्या सीझनमध्ये या शोचे शूटिंग परदेशातील लोकेशन्सवर होत असे. मात्र यावेळच्या शोचे शूटिंग संपूर्णपणे मुंबईत पार पडणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये करण वाही, ऋत्विक धनंजानी, हर्ष लिंबाचिया, रश्मी देसाई, निया शर्मा, चमेली भसीन, एली गोनी आणि जय भानुशाली यांचा समावेश आहे. १ ऑगस्टपासून शोचे प्रसारण सुरू झाले आहे. या वर्षाच्या सुरूवातीस रोहित शेट्टीने आपली मदत एफडब्लूआयसीई या संस्थेला केली होती. कोरोनाच्या साथीमुळे घरीच अडकून पडलेल्या फोटोग्राफर्ससाठी त्याने ही मदत केली होती.

हेही वाचा - सुशांतच्या कुटुंबात भांडण होऊ नये म्हणून रिया त्याच्या घरी थांबत नव्हती; स्मिता पारीखचा खुलासा

यापूर्वी त्याने कोरोना ड्यूटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही आपल्या मदतीचा हात दिला होता. यामध्ये त्याने ड्युटी कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी शहरभरातील 11 हॉटेल्समध्ये सोय केली होती. कोरोनाव्हायरस वॉरियर्सना आराम करण्यासाठी हॉटेल्सची सोय करण्यात आली होती आणि या हॉटेलमध्ये न्याहारी आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्थादेखील केली गेली होती. चित्रपटाच्या आघाडीवर रोहित शेट्टीचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटगृहाच्या प्रदर्शनासाठी थिएटर्स उघडण्याची प्रतीक्षा रोहित शेट्टी करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details