महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'शांत राहा, संयम बाळगा', दिल्ली हिंसाचारावर रोहित शेट्टीची प्रतिक्रिया - दिल्ली हिंसाचारावर रोहित शेट्टी

दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहितला दिल्ली हिंसाचारावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.

Rohit Shetty on Delihi Violence, Rohit Shetty news, Rohit Shetty in latest news, Rohit Shetty on Delhi violence, दिल्ली हिंसाचारावर रोहित शेट्टी, Rohit Shetty news
'शांत राहा, संयम बाळगा', दिल्ली हिंसाचारावर रोहित शेट्टीची प्रतिक्रिया

By

Published : Mar 3, 2020, 12:40 PM IST

मुंबई - 'दिल्ली हिंसाचार हा देशाचा गंभीर विषय आहे. याबद्दल विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. मात्र, ही परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत सर्वांनी शांत राहावं आणि संयम बाळगावा', असे मत दिग्दर्शक रोहित शेट्टीने व्यक्त केले आहे. 'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान त्याने आपली प्रतिक्रिया दिली.

दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. २ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च मुंबई येथे पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहितला दिल्ली हिंसाचारावर प्रतिक्रिया विचारण्यात आली होती.

'शांत राहा, संयम बाळगा', दिल्ली हिंसाचारावर रोहित शेट्टीची प्रतिक्रिया

हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या ट्रेलर लॉन्चदरम्यान अजय देवगण, अक्षय कुमारने केलं चाहत्यांना खास आवाहन

'दिल्लीत नेमकी काय परिस्थिती आहे, याचा अंदाज आपल्याला मुंबईत राहून नाही येऊ शकत. ही परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण शांत राहावं. जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत तरी सर्वांनी शांत राहावे', असेही रोहित यावेळी म्हणाला.

हेही वाचा -टायगर, रितेश आणि श्रद्धाने उलगडले 'बागी ३' च्या शूटिंगचे धमाल किस्से

ABOUT THE AUTHOR

...view details