महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी'च्या चित्रीकरणाला आजपासून सुरूवात - sooryavanshi

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी अजय देवगण, रोहित शेट्टी, रणवीर सिंग आणि अक्षय कुमारचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

'सूर्यवंशी'च्या चित्रीकरणाला सुरूवात

By

Published : May 6, 2019, 1:12 PM IST

मुंबई- अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच आणखी एक अॅक्शनपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'सिंबा' चित्रपटातूनच रोहितने आपल्या या चित्रपटाची घोषणा केली होती. सूर्यवंशी असे या चित्रपटाचे शीर्षक असून चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

सिंबा, सिंघम आणि सिंघम रिटर्न्स पाठोपाठ या चित्रपटातही एका पोलीस अधिकाऱ्याचीच कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी अजय देवगण, रोहित शेट्टी, रणवीर सिंग आणि अक्षय कुमारचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंगदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान सूर्यवंशी चित्रपटात अक्षयच्या अपोझिट कॅटरिनाची वर्णी लागली आहे. कॅटरिना आणि अक्षयने याआधीही अनेक चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे. रोहित शेट्टीचं दिग्दर्शन आणि अक्षय कॅटरिनाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला निश्चितच प्रेक्षकांची पसंती मिळेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details