महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आईच्या मायेची उब पांघरुन देशमुखांची दिवाळी, आईंच्या साडीपासून शिवले सर्वांचे कपडे - Ritesh Stiches shirts from mother's old sari

अभिनेता रितेश देशमुखची दिवाळी खास आहे. यावेळी त्यांच्या आईच्या जुन्या साडीपासून बनवलेले कपडे रितेश आणि त्याच्या मुलांनी परिधान केले आहेत. याचा एक व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Ritesh's Diwali
रितेश देशमुखची दिवाळी खास

By

Published : Nov 14, 2020, 6:18 PM IST

मुंबई- दिवाळीनिमित्ताने बॉलवुड स्टार्समध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. सेलेब्स या निमित्ताने आपले फोटो शेअर करत एकमेकांचे अभिनंदन करत आहेत. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच त्याची शैली इतर लोकांपेक्षा वेगळी आहे. यात रितेश देशमुख आपल्या दोन मुलांसह कुर्ता-पायजामा परिधान करताना दिसत आहे. पण खास गोष्ट म्हणजे हे कपडे त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून बनविलेले आहेत. रितेश देशमुख यांनी स्वत: व्हिडिओमध्ये ही माहिती दिली आहे.

हेही वाचा - मला वृद्ध होण्यास कधी वेळच मिळाला नाही - डॉली पार्टन

रितेश देशमुख यांनी हा व्हिडिओ दिवाळीनिमित्त आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला रितेश यांच्या आई साडी दाखवताना दिसतात. त्यानंतर रितेश देशमुख आणि त्याची मुले एकाच रंगाचे कपडे घालताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना रितेशने लिहिलंय "आईची जुनी साडी, मुलांसाठी नवीन दिवाळी कपडे. दिवाळीच्या शुभेच्छा." रितेश देशमुख यांचा हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लगेचच तो व्हायरल झाला आहे.

चाहत्यांसमवेत सेलेब्सही रितेश देशमुखच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख त्याच्या शैलीने चाहत्यांची मने जिंकतो. अलीकडेच तो द कपिल शर्मा शोमध्ये त्याची पत्नी जेनेलिया डिसोझा सोबत दिसला होता. यावेळी त्याने आपल्या लग्नाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

हेही वाचा - अहोरात्र शूटिंगनंतर पंकज त्रिपाठींनी दिवाळीत गाठला गोवा

रितेश आणि जेनेलिया नेहमी एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याने आणि त्याच्या पत्नीने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. कामाचा विचार करता रितेश देशमुख अखेर 'बागी 3' मध्ये दिसला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details