मुंबई- आषाढी एकादशीनिमित्त भक्त विठ्ठलाच्या नामघोषात दंग झाले आहेत. सर्वत्र विठाबोच्या नामाचा जयघोष होत आहे, अशात आता कलाकारही भक्ती रंगात न्हाऊन निघाले आहेत. बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ आता रितेश देशमुखनेही आपल्या चाहत्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
घे कुशीत, गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा, रितेशच्या 'लय भारी' शुभेच्छा - lay bhari
अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या 'लय भारी' चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं होतं. या चित्रपटातील अजय गोगावलेच्या आवाजातील माऊली-माऊली गाण्याने तर प्रेक्षकांना ठेका धरण्यास भाग पाडलं होतं.
अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या 'लय भारी' चित्रपटाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर राज्य केलं होतं. या चित्रपटातील अजय गोगावलेच्या आवाजातील माऊली माऊली या गाण्याने तर प्रेक्षकांना ठेका धरण्यास भाग पाडलं होतं.
याच गाण्याच्या ओळी रितेशनं आषाढी एकादशीच्या निमित्ताने शेअर केल्या आहेत. मुख दर्शन व्हावे आता, तू सकल जगाचा त्राता, घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा, माऊली माऊली, माऊली माऊली, अशा गाण्याच्या ओळी लिहित रितेशनं आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.