मुंबई- करण जोहरची निर्मिती असलेला 'कलंक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपासून चित्रपटातील गाणी आणि नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशात शुक्रवारी या चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित होणार होतं. मात्र, काही कारणांमुळे ते एक दिवस पुढे ढकलण्यात आलं.
करणने याबद्दलची माहिती देणार ट्विट शेअर करत प्रेक्षकांची माफी मागितली. करणचं हेच ट्विट रिट्विट करत रितेशने त्याची चांगलीच मजा घेतली आहे. कलंकचं टायटल ट्रॅक एक दिवस उशीरा प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत मी तुमच्या भेटीला घेऊन आलोय करण जोहरचं खास गाणं, असं कॅप्शन देत रितेशने एक व्हिडिओ शेअर केला आहे.