महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लोक म्हणतात, ७ वर्ष खूप मोठा काळ, पण माझ्यासाठी..विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक - लोकप्रिय

लोक म्हणतात, ७ वर्ष हा खूप मोठा काळ आहे. पण माझ्यासाठी हे काल परवाच झाल्यासारखं आहे. मिस यू पापा, असं रितेशनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर रितेशची पत्नी अभिनेत्री जेनिलियानंही आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे.

विलासरावांच्या आठवणीत रितेश भावूक

By

Published : Aug 14, 2019, 4:16 PM IST

मुंबई- महाराष्ट्राचा लोकनेता अशी ओळख असलेल्या दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज ७ वा स्मृतिदिन आहे. आपल्या कर्तुत्वाने आजही लाखो जनतेच्या मनात घर करून राहणाऱ्या या नेत्याच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. आजही अनेकांच्या ओठी त्यांचे नाव ऐकायला मिळते. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

लोक म्हणतात, ७ वर्ष हा खूप मोठा काळ आहे. पण माझ्यासाठी हे काल परवाच झाल्यासारखं आहे. मिस यू पापा, असं रितेशनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर रितेशची पत्नी अभिनेत्री जेनिलियानंही आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे. प्रत्येक दिवशी तुमची आठवण येते, असं तिनं यात म्हटलं आहे.

दरम्यान राजकीय प्रवासाबद्दल बोलायचे झाल्यास, 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003 आणि 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008 या कालखंडात विलासरावांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. वक्तृत्वाच्या आणि कर्तृवाच्या जोरावर विलासरावांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली.

ABOUT THE AUTHOR

...view details