महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Ritesh Genelia Film : रितेश-जेनेलिया प्रेग्नंट !! 'मिस्टर ममी'चे पोस्टर रिलीज - मिस्टर मम्मी फर्स्ट लुक

रितेश-जेनेलिया 'मिस्टर ममी' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचा खूपच मजेशीर फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.

रितेश-जेनेलिया प्रेग्नंट
रितेश-जेनेलिया प्रेग्नंट

By

Published : Feb 4, 2022, 5:16 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश दशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार आहे. अलीकडेच, या जोडप्याने लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना एक नवीन चित्रपट देखील भेट दिली आहे. रितेश-जेनेलिया 'मिस्टर ममी' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे, जो पाहणे खूपच मजेशीर आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.

रितेश-जेनेलिया प्रेग्नंट

शुक्रवार 4 फेब्रुवारी रोजी निर्मात्यांनी चित्रपटाचे अनेक पोस्टर लाँच केली आहेत. या पोस्टर्सवर रितेश आणि जेनलिया प्रेग्नंट दिसत आहेत. या पोस्टर्सची टॅग लाइन 'भरपूर दिल कॉमेडी पेट से' अशी मजेशीर आहे.

'मिस्टर मम्मी' चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करणार आहे. भूषण कुमार आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर पोस्टरवरुन लक्षात येते की कथा एका जोडप्याभोवती फिरते ज्यांचे विचार मुलाच्या बाबतीत जुळत नाहीत. चित्रपटात ही कथा विनोदी शैलीत मांडण्याची तयारी सुरू आहे. जर पुरुष प्रेग्नंट झाला तर? हेही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

रितेश-जेनेलिया प्रेग्नंट

रितेश आणि जेनेलियाची जोडी शेवटची 'तेरे नाल लव हो गया' (2012) या चित्रपटात दिसली होती. लग्नानंतर ही जोडी चित्रपटांमध्ये काम करत असली तरीही दोघेही पडद्यावर एकत्र दिसले नाहीत.

रितेश आणि जेनेलियाने 'मुझे तेरी कसम' (2003) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर दोघेही कॉमेडी चित्रपट मस्ती (2004) मध्ये एकत्र आले. 'मिस्टर ममी' हा रितेश आणि जेनेलियाचा एकत्र चौथा चित्रपट असेल. जेनेलिया शेवटची इट्स माय लाइफ (२०२०) या चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा -Urmila Matondkar Birthday : बालकलाकार ते आघाडीची अभिनेत्री होण्याचा उर्मिलाचा प्रवास..

ABOUT THE AUTHOR

...view details