मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जेनेलियाच्या ड्रायव्हिंग स्कीलची मस्करी केली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करुन जेनिलियाची खिल्ली उडवली आहे. रितेशने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला. यात त्यांची मुले रियान आणि राहिल दिसत आहेत. रितेशच्या या व्हिडिओवर बॉलिवूडचे अनेक सेलेब्रिटी व्यक्त झाले आहेत.
या व्हिडिओत रितेश रुबिक क्यूब ही गेम खेळत असून रितेश-जेनेलियाची दोन मुले रियान आणि राहिल खिडकीतून बाहेर पाहाताना दिसतात. त्यांना रस्त्यावरची वाहतूक दिसत असते. अचानक एक भरधाव कार मागून येते आणि पुढे जाणाऱ्या कारला मागून थडकते. तेव्हा ही दोन मुले रितेशकडे पाहून म्हणतात, "बाबा, आई आली.."
''बाबा, आई आली'', हा मुलांचा आवाज ऐकताच रुबिक क्यूब गेम खेळणारा रितेश आपला चेहरा पाडतो आणि पार्श्वसंगीत सुरू होते, "छन से जो टूटे कोई सपना..जग सुना सुना लागे..." अशा मजेशीरपणे रितेशने या व्हिडिओतून पत्नी जेनेलियाच्या ड्रायव्हिंगची खिल्ली उडवली आहे.