मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेत आहेत. या लढाईमध्ये त्यांना सहानुभूती देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटोही कलाकार सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अशात आता रितेशनंही त्यांची भेट घेतली आहे.
रितेश म्हणतोय, नीतू कपूरला दहा वर्षांनंतर पाहूनही मी हेच वाक्य म्हणेन - ताहिरा कश्यप
रितेशनं पत्नी जेनिलियासोबत ऋषी यांची भेट घेतली. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या भेटीचा फोटो शेअर करत त्याने याला कॅप्शनही दिलं आहे.
रितेशनं पत्नी जेनिलियासोबत ऋषी यांची भेट घेतली. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या भेटीचा फोटो शेअर करत त्याने याला कॅप्शनही दिलं आहे. एक सुंदर संध्याकाळ आमच्यासोबत घालवण्यासाठी आभारी आहे ऋषी कपूर सर. जेनिलिया आणि मला तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. नीतू मॅम तुम्ही खूप छान जेवण बनवलं. पुन्हा एकदा तीच गोष्ट बोलेल, की १० वर्षांनंतरही जेव्हा मी तुम्हाला भेटेल तेव्हा माझ्या तोंडून हेच शब्द पहिल्यांदा बाहेर पडतील, की तुम्ही खूप सुंदर आहात.
तर ऋषी कपूर यांनीही फोटो शेअर करत या भेटीसाठी रितेश, जेनिलिया आणि अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत. मागच्या वर्षी बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. सोनाली बेंद्रे, इरफान खान, ताहिरा कश्यप यांच्या कॅन्सरचे वृत्त समोर आल्याने कलाविश्वात खळबळ उडाली होती.