मुंबई- ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या आस्थीचे रविवारी बाणगंगा तलावामध्ये विसर्जन करण्यात आले. रणधीर कपूर यांनी याबद्दलची माहिती दिली. लॉकडाऊनमुळे आस्थी विसर्जनासाठी हरिद्वाराला जाण्याची परवानगी न मिळाल्याने बाणगंगामध्येच आस्थी विसर्जित केल्याचे रणधीर यांनी सांगितले.
बाणगंगामध्ये ऋषी कपूर यांच्या अस्थींचे विसर्जन
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या आस्थीचे रविवारी बाणगंगा तलावामध्ये विसर्जन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे आस्थी विसर्जनासाठी हरिद्वाराला जाण्याची परवानगी न मिळाल्याने बाणगंगामध्येच आस्थी विसर्जित केल्याचे रणधीर यांनी सांगितले.
ऋषी कपूर गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. अशात बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरुवारी 30 एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ऋषी यांच्या आस्थी विसर्जनावेळी रणबीर कपूर आणि नीतू कपूर उपस्थित होते. याशिवाय ऋषी यांची मुलगी रिधीमा दिल्लीला असल्याने ती वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नव्हती. तिनेही आस्थी विसर्जनावेळी हजेरी लावली. 5 ते 6 लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.