मुंबई- अभिनेता ऋषी कपूर यांच्या मुंबई वापसीला आता काहीच दिवस बाकी आहेत. जवळपास गेल्या एका वर्षापासून ऋषी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. अशात त्यांच्या वापसीनिमित्त नीतू कपूर यांनी एक पोस्ट शेअर करत या कठीण काळातील परिस्थितीविषयी सांगितलं आहे.
ऋषी कपूरची लवकरच मुंबई वापसी, नीतू यांनी शेअर केली पोस्ट - नीतू कपूर
नीतू यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्या म्हणतात, या कठीण काळाता आमची मदत केली ती खूप खूप सुंदर आणि प्रेमळ लोकांनी.
![ऋषी कपूरची लवकरच मुंबई वापसी, नीतू यांनी शेअर केली पोस्ट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4289962-thumbnail-3x2-neetu.jpg)
नीतू यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्या म्हणतात, 'या कठीण काळाता आमची मदत केली ती खूप खूप सुंदर आणि प्रेमळ लोकांनी. गौरी शाहरुख लव यू,' असं नीतू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टसोबत त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नीतू सोफ्यावर बसल्या असून त्यांच्यासोबत गौरी आणि ऋषी कपूर आहेत.
दरम्यान गेल्या १० महिन्यांत अनेक कलाकारांनी न्यूयॉर्कमध्ये जाऊन ऋषी यांची भेट घेतली आहे. यात दीपिका, आमिर खान, विकी कौशल, अनुपम खेर, मलायका अरोरा खान आणि अर्जुन कपूर यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.