मुंबई- गेल्या अनेक दशकापासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या ऋषी कपूर यांनी भारतीयांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मात्र, या अभिनेत्याची जादू केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरली आहे. याचाच पुरावा आहे, ऋषी कपूर यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ.
न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूरला भेटला जबरा फॅन, पाहा व्हिडिओ - मैं शायर तो नहीं
न्यूयॉर्कमधील आपल्या या चाहत्याला पाहून ऋषी याचा व्हिडिओ घेण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत या चाहत्याचे आभार मानले आहेत.
या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर न्यूयॉर्कमधील एका सलूनमध्ये हेअरकट करण्यासाठी गेले आहेत. यावेळी त्यांचा एक रशियन फॅन याठिकाणी भेटला. ऋषी कपूर यांना समोर पाहताच त्यानं ऋषी यांच्या पदार्पणीय बॉबी चित्रपटातील 'मैं शायर तो नहीं', हे गाणं प्ले केलं.
न्यूयॉर्कमधील आपल्या या चाहत्याला पाहून ऋषी त्याचा व्हिडिओ घेण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत या चाहत्याचे आभार मानले आहेत. या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळत आहे.