महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऋषी कपूर यांनी 'शर्माजी नमकीन' च्या शुटींगला केली सुरुवात - Rishi Kapoor returns to films with Sharmaji Namkeen

ऋषी कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'शर्माजी नमकीन' या चित्रपटाच्या शूटींगला त्यांनी सुरुवात केली आहे.

Sharmaji Namkeen
'शर्माजी नमकीन' या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात

By

Published : Dec 5, 2019, 11:56 PM IST


मुंबई - दिग्गज अभिनेता ऋषी कपूर वर्षभर रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. गेल्या वर्षी ते अमेरिकेला उपचारासाठी रवाना झाले होते. ११ महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. भारतात परतल्यानंतर ते पुन्हा कधी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करतात याची प्रतीक्षा होती. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी दिग्दर्शक हितेश भाटीया यांच्या 'शर्माजी नमकीन' या चित्रपटाच्या शुटींगला सुरू केली होती. मात्र, त्यांच्या परदेशी जाण्याने सिनेमाचे पुढील शूटींग थांबले होते. अखेर पुन्हा एकदा या सिनेमाच्या शुटींगसाठी ऋषी कपूर सज्ज झाले आहेत.

निर्माता रितेश सिध्दवानी यांनी गुरुवारी ट्विट करीत ऋषीजींच्या पुन्हा सेटवर परतण्याची बातमी दिली. रितेश यांनी लिहिलंय, "ऑन स्क्रिन गोड, ऑन स्क्रिन गोड...ऋषि कपूर, जूही चावला, हनी त्रेहान, अभिषेक चौबे आणि हितेश भाटीया यांच्यासारखे प्रतिभावंत जेव्हा एकत्र येतात तेव्हा उत्सुकता सातव्या आसमानला पोहोचते. चला 'शर्माजी नमकीन' चे २०२० मध्ये स्वागत करुयात."

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी या बातमीला दुजोरा देणारे ट्विट केले आहे. ऋषी कपूर यांना रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या त्यांच्या चाहत्यांसाठी ही खूशखबर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details