महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शशी कपूर यांच्या जयंती निमित्त ऋषी कपूर यांनी जागवल्या आठवणी - Kunal Kapoor

शशी कपूर यांच्या आठवणी ऋषी कपूर यांनी जागवल्या...फाळके पुरस्काराच्यावेळचा फोटो त्यांनी शेअर केलाय...या फोटोत कपूर फॅमिली दिसत आहे...

शशी कपूर यांच्या आठवणी ऋषी कपूर यांनी जागवल्या

By

Published : Mar 18, 2019, 7:26 PM IST


मुंबई - दिवंगत अभिनेता आणि निर्माता शशी कपूर यांच्या आठवणीत त्यांचा पुतण्या आणि दिग्गज अभिनेता ऋषी कपूर रमलेले दिसले. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शशी कपूर यांच्या आठवणी जागवल्या,

शशी कपूर यांना २०१५मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या फोटोत शशी कपूर यांच्यासह, ऋषी कपूर, नीतू कपूर, करिश्मा कपूर आणि रणबीर कपूर दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, '''जन्मदिनाच्या शुभेच्छा, शशी अंकल,''

सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांनी शशी कपूर यांची मुले कुणाल आणि संजना कपूर यांच्यासह एक फोटोदेखील शेअर केला आहे.

ऋषी कपूर यांनी यांनी लिहिलंय, "शशी कपूर हे संपूर्ण परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहेत. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला, जन्मदिनाच्या शुभेच्छा, शशी अंकल."

शशी कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शित 'आगा' चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६१ मध्ये त्यांनी 'धरमपुत्र' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

भारतीय चित्रपटातील त्यांच्या योगदानासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्म भूषण पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांनी 'दीवार', 'सत्यम शिवम सुंदरम' आणि 'कभी कभी' यासारख्या गाजलेल्या चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.

निर्माता म्हणून त्यांनी 'जुनून', 'विजेता' आणि '36 चौरंगी लेन' यासारखे चित्रपट बनवले. तर त्यांनी १९९१ मध्ये 'अजूबा' या चित्रपटाचे दिग्दर्शक करुन या क्षेत्रात पाऊल टाकले होते.

शशी कपूर यांचे २०१७ मध्ये ७९ व्या वर्षी लिवर सिरोसिस या आजाराने निधन झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details