मुंबई - दिवंगत निर्माता मनमोहन देसाईंच्या जन्मदिनी ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांनी आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली. बुधवारी ट्विट करत ऋषी कपूर यांनी एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला.
फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, आज मनमोहन देसाईंच्या जन्मदिनी त्यांचे स्मरण करताना.
ऋषी कपूर यांनी आपल्या परिवारासह मनमोहन देसाईंच्या सिनेमात काम केले होते. याबद्दलची आठवण जागवताना ऋषी कपूर यांनी लिहिलंय, त्यांनी सर्व कपूरसोबत काम केले आहे. त्यांना आमच्यासोबत काम करण्याचा शौक होता. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ.
देसाई यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक क्लासिक चित्रपट बनवले. यात 'मर्द', 'कुली', 'तुफान' आणि 'अमर अकबर अँथनी' या चित्रपटात ऋषी कपूर यांनी कामकेले होते. मनमोहन देसाईंचा १९९३ मध्ये आलेला 'अनमोल' हा चित्रपट ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट होता.