मुंबई- बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर उपचार घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा आजार बरा झाला असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर ऋषी यांना भारतात परतण्याचे वेध लागले, अनेकदा आपल्या पोस्टमधून त्यांनी हे बोलूनही दाखवलं.
आ अब लौट चले, ट्विट शेअर करत ऋषी कपूरनं दिले भारतात परतण्याचे संकेत - मुंबई
ऋषी यांनी नुकतंच शेअर केलेल्या एका ट्विटर पोस्टमधून भारतात परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या दिग्दर्शनात तयार झालेल्या आ अब लोट चले चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे
अशात आता ऋषी यांनी नुकतंच शेअर केलेल्या एका ट्विटर पोस्टमधून भारतात परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या दिग्दर्शनात तयार झालेल्या आ अब लौट चले चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं, न्यूयॉर्कमध्ये चित्रीत झालेल्या १९९८ मध्ये आलेल्या आ अब लौट चले या चित्रपटाचं शीर्षक आजच्या परिस्थितीशी मिळतं जुळतं आहे.
त्यांच्या या पोस्टनंतर ऋषी कपूर मुंबईला परतण्यासाठी सज्ज झाले असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान ऋषी कपूर यांनी आ अब लौट चले चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या सिनेमात अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका आहेत.