मुंबईः अभिनेत्री रिचा चढ्ढाने आपल्या ट्विटर अकाउंटची सेटिंग्स खासगीमध्ये बदलली आहेत. या निर्णयामागील अभिनेत्रीनेही आपले स्पष्टीकरण दिले आहे.
रिचाने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला की तिने आपल्या अकाउंट सेटिंग्स खासगी का केल्या. तिने पोस्ट केले की, "मी माझे खाते खासगी बनवणार आहे. असं नाही की हे व्यासपीठ विषारी आहे म्हणून.(आता जग देखील विषारी आहे, म्हणून आता काय करावे)."
रिचा चढ्ढाने ट्विटर अकाऊंट केले प्रायव्हेट हेही वाचा - संजना सांघीचा कंगनावर पलटवार, म्हणाली...
"मी फक्त विनोद समजून घेण्यासाठी, समर्थन करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, येथे आले आहे, परंतु माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि या मूर्खपणाच्या स्क्रोलिंगला बराच वेळ लागतो. " अभिनेत्री रिचाने तिच्या मोबाइल फोनवरून एक स्क्रीनशॉट शेअर केला, यात सध्या तिचा सोशल मीडियाचा दैनिक वेळ 4 तास 14 मिनिटांचा आहे. तिचा साप्ताहिक एकूण 29 तास 40 मिनिटांचा आहे, त्यापैकी 19 तास 49 मिनिटे सोशल नेटवर्किंगवर आणि 9 तास केवळ ट्विटरवर घालवले जातात.
त्याचवेळी एका युजरने या पोस्टवर भाष्य केले की "आनंद आणि समृद्धीचा उत्तम मंत्र म्हणजे आपली सर्व सोशल मीडिया खाती हटविणे."