मुंबई - अभिनेता अली फजल आणि रिचा चढ्ढा यांच्या नात्याची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांनीही वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात लग्नासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या लग्नाची तारीख १५ मार्च असल्याचे समोर आले आहे.
अली फजल आणि रिचा 'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या चित्रपटात एकत्र दिसले होते. बऱ्याच दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी कलाविश्वात जोर धरला होता.
हेही वाचा -टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती'चा येणार सिक्वेल, पोस्टर प्रदर्शित
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, रिचा मागच्या वर्षी अक्षय खन्नासोबत 'सेक्शन ३७५' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तिने यावर्षी कंगना रनौतसोबत 'पंगा' या चित्रपटात भूमिका साकारली होती.
हेही वाचा -तमिळ अॅक्शन थ्रिलर 'कायथी'च्या रिमेकमध्ये बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची वर्णी