महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रियाची कोविड टेस्ट आली निगेटिव्ह - रिया चक्रवर्तीची कोविड चाचणी

रिया चक्रवर्तीची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. सायन रुग्णालयात ही चाचणी पार पडली होती. तिचा अहवाल मिळाला असून तिला कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rhea
रिया चक्रवर्ती

By

Published : Sep 8, 2020, 7:18 PM IST

मुंबई - नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे. सायन रुग्णालयात तिची चाचणी करण्यात आली होती. तिचा अहवाल मिळाला असून तिला कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज तिला एनसीबीने अटक केली आहे. ड्रग पुरवणाऱ्यांशी तिचा संपर्क होता, हे एनसीबीच्या तपासात स्पष्ट झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली. एनसीबी, ईडी आणि सीबीआयच्या तपासात ती सहकार्य करीत होती. गेले काही आठवडे ती सलग तपासासाठी बोलवण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचायची. असंख्य तास तिची तपासणी सुरू होती.

या काळात रियाला अनेकवेळा मीडियाच्या गराड्यातून स्वतःला सांभाळत जावे लागत होते. तिच्या मीडियाच्या अनेक बूम माईक आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क आला होता. यावेळी कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नव्हते. त्या अनुषंगाने ही तपासणी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details