मुंबई- अभिनेत्री रिया चक्रवर्तीला गुरुवारी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला बोलवण्यात आले होते. सुशांत सिहच्या आत्महत्येच्या केससंबंधी रियाची ९ तास चौकशी करण्यात आली.
१४ जूनला सुशांतचा मृतदेह फॅनला लटकलेला आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. मात्र खोलीमध्ये सुसाईड नोट मिळाली नव्हती. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करीत आहेत. आतापर्यंत १० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली असून जवाब नोंदवण्यात आले आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यापासून सुशांतच्या सर्वात जवळ रिया चक्रवर्ती होती. दोघे नेहमी एकत्र राहात होते. तिला आज पोलिसांनी बोलवून चौकशी केली. रियाच्या तापासाबद्दल बोलताना सूत्राने सांगितले, रिया आणि सुशांत यांचे चॅटिंग तपासण्यात आले. तिचा पूर्ण फोन स्कॅन करण्यात आला. यात फोटो आणि व्हिडिओंचा समावेश होता.
दोघांच्या रिलेशनशिपबद्दल सूत्राने सांगितले, रियाने सुशांतसोबत राहात असल्याचे सांगितले. ते प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करीत होते हेदेखील तिने पोलिसांना सांगितले. २०२० मध्ये त्यांनी विवाह करण्याचा विचार केला होता.
सूत्राने पुढे सांगितले, त्यांनी ब्रेकअपचा विचार केला होता का असा प्रश्न पोलिसांनी रियाला विचारला. असे वाटते की तिने दोघांच्यामधील भांडणे, सोडून जाणे याबद्दल रियाने पोलिसांना सांगितले असावे. आत्महत्या करण्यापूर्वी सुशांतने रियाचा नंबर डायल केला होता. मात्र तिच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नव्हते.
कॉल रेकॉर्डनुसार रिया ही शेवटची व्यक्ती आहे जिला सुशांतने झोपण्यापूर्वी फोन केला होता. सुशांतने पहिल्यांदा महेश शेट्टीला फोन केला. त्याने उचलला नाही. त्यानंतर त्याने रियाला फोन केला मात्र तिनेही उचलला नव्हता. तो झोपायला गेला. उठून पाहिले तर महेशचा फोन येऊन गेला होता. त्याने फोन करायचा प्रयत्न केला, मात्र लागला नाही.