मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस बिहार सरकार करू शकत नाही, अशी माहिती अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी मंगळवारी दिली. राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची शिफारस करण्याचा निर्णय बिहार सरकारने घेतला आहे. सुशांतच्या वडिलांनी विनंती केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी सांगितले.
अशा प्रकरणात स्थानांतरण होऊ शकत नाही, ज्याच्यात बिहार पोलीसांनी भाग घ्यावा यासाठी कोणताही कायदेशीर आधार नाही. सर्वाधिक म्हणजे, ती झिरो एफआयआर असेल जी नंतर मुंबई पोलिसात वर्ग केली जाईल," असे रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. खटल्याचे हस्तांतरण सीबीआयकडे करण्यासाठी बिहार पोलिसांना कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले.
या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार बिहार सरकारला नाही, हे लक्षात आल्यामुळे "बेकायदेशीर पद्धत" अवलंबुन आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचेही मानेशिंदे यांनी सांगितले.
यापूर्वी रिया चक्रवर्ती हिने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यात म्हटले होते की, बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे अधिकार नाहीत, कारण मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदविला आहे.