महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2020, 5:40 PM IST

ETV Bharat / sitara

रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी सुरू; 3 कंपन्यांसंदर्भात विचारले जातायेत प्रश्न

सुशांतसिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनी मिळून तीन कंपन्यांची स्थापना केली होती. या कंपन्यांमधील आर्थिक व्यवाहाराची चौकशी ईडीकडून सुरू झाली आहे. रियाला ईडीच्या अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. ही चौकशी उशीरापर्यंत चालणार आहे.

Rheaa Chakraborty's ED probe continues
रिया चक्रावर्तीची ईडी चौकशी सुरू

मुंबई-सुशांतसिंह राजपूत प्रकरणी 'ईडी'कडून चौकशी केली जात आहे. यासंदर्भात सुशांतसिंहची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. रिया चक्रवर्तीला ईडीकडून काही कंपन्यांविषयी माहिती विचारली जात असून, रियाची रात्री उशिरापर्यंत चौकशी होणार आहे.

1) सुशांतसिंह याच्यासोबत रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांनी सुरू केलेल्या फ्रंट इंडिया वर्ल्ड फाऊंडेशन ही कंपनी 6 जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. यातील शेअर कॅपिटल 1 लाख रुपये तर पेड कॅपिटल 1 लाख रुपये होते. या कंपनीवर सुशांतसिंह व शोविक चक्रवर्ती हे दोघे संचालक होते. सोशल वर्क करण्याचा संदर्भात कंपनी काम करीत होती. या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर आहे U85300NP2020NPL335524, तर कंपनी रजिस्ट्रेशन नंबर आहे 335524. ही कंपनी ज्या पत्त्यावर दाखविण्यात आली आहे त्याचा पत्ता आहे, फ्लॅट नंबर 503 साई फॉर्च्युन प्लॉट 15 सेक्टर 8 उलवे नवी मुंबई.

2) सुशांतसिंह याने सुरू केलेल्या innsaei ventures pvt ltd ही कंपनी 6 एप्रिल 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. यातील शेअर कॅपिटल 1 लाख रुपये तर पेड कॅपिटल 1 लाख रुपये होते. या कंपनीवर सुशांतसिंह व वरूण माथूर, सौरभ मिश्रा हे संचालक होते. याचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर आहे. U930HR2018PTC073830 कंपनी रजिस्ट्रेशन नंबर आहे 73830. कंपनी कार्यालयाचा पत्ता - b 204 दि जुडा कोपरेटीव जीएच 1 सेक्टर 56 गुरुग्राम.

3) विविद्रीग रिहालिटी प्रायवेट लिमिटेड ही कंपनी 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर कॅपिटल 1 लाख व पेड 1 लाख होते. कम्प्युटर मेंटेनस व वेबसाईट संदर्भात मेंटेनस व प्रेझेन्टेशनचं काम या कंपनीत होत होत. कंपनी संचालक म्हणून सुशांतसिंह राजपूत, शोविक चक्रवर्ती व रिया चक्रवर्ती यांची नावे आहेत. U72900MH2019PTC330454 हा कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर आहे. कंपनी कार्यालयाचा पत्ता आहे , फ्लॅट नंबर 503 साई फॉर्च्युन प्लॉट 15 सेक्टर 8 उलवे नवी मुंबई.

ABOUT THE AUTHOR

...view details