मुंबई - अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने तिच्याकडे सुसांतसिंहच्या केवळ दोनच वस्तू असल्याचे स्पष्ट केले आहे. एक म्हणजे सुशांतची सिपर बाटली, ज्यावर २०१९ च्या सुपरहिट छिछोरे चित्रपटाचे शीर्षक आहे आणि दुसरी वस्तू म्हणजे त्याची डायरी, ज्यात सुशांतने आपली कृतज्ञता यादी लिहिलेली आहे.
रिया चक्रवर्तीचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी अलिकडेच रियाच्या नोटबुकमधील "कृतज्ञता यादी" चा फोटो शेअर केला आहे. यामध्ये सुशांतने रियाच्या फॅमिलीचे त्याच्या आयुष्यात असलेले महत्व लिहिले आहे.
रियाच्या नोटबुकमधील "कृतज्ञता यादी" चा फोटो या यादीमध्ये असलेल्या नावांबद्दल स्पष्ट करताना रियाने लिहिलंय, ''सुशांतची माझ्याकडे असलेली एकमेव मालमत्ता. आणि हे त्याने आपल्या हस्ताक्षरात लिहिलंय लिलू म्हणजे शौविक (तिचा भाऊ), बेबू म्हणजे मी, सर म्हणजे माझे वडिल, मम्मा म्हणजे माझी आई, फ्यूज म्हणजे त्याचा कुत्रा.''
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी पार्श्वभूमीवर, अंमलबजावणी संचालनालयाने रिया, तिचा भाऊ शौविक, तिचा चार्टड अकाऊंटंट रितेश शहा आणि माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांच्याकडे आठ तासांपेक्षा अधिक काळ चौकशी केली होती. त्यापार्श्वभूमीवर रियाची ही नोट अपडेट करण्यात आली आहे.
रियाच्या या यादीच्या पोस्टवर सोशल मीडियामध्ये भरपूर कॉमेंट्स मिळत आहेत. तिची खिल्ली उडवणाऱ्या अनेक प्रतिक्रियाही तिला मिळत आहेत. यामुळे ती ट्रोलदेखील होत आहे.
हेही वाचा-अभिनेता अभिषेक बच्चनची कोरोना चाचणी निगेटिव्ह
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या स्पेसिफिक पोस्टवर एका युजरने लिहिलंय, ''पहिले म्हणजे... तो तिच्यासोबत मानसोपचारतज्ञाकडे जात होता. पॉझिटिव्ह विचार मनात यावा यासाठी अशा प्रकारे ते लिहायला सांगतात. दुसरे म्हणजे मादक व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असताना ती नेमकी कशी आहे हे समजायला उशीर लागतो. तिसरे तिच्या दाव्याबद्दल: तिचा इन्स्टाग्राम स्वतःच याबद्दल सांगत आहे..जेव्हा ती आपल्या एकटीचा पोर्टफोलिओ ती सिध्दार्थ पिठाणीकडन करुन घेत आहे. आतापर्यंतचे सर्वात वाईट लोक...इतिहास असल्याविषारी परिस्थितीची आठवण राखेल.''
दरम्यान, सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती, इंद्रजित चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतर सहा आरोपींविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर नोंदविला आहे. सुशांतसिंहचे वडील केके सिंह यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आत्महत्या आणि पैसे उधळण्याचे आरोप रियाच्या विरोधात केले होते.