महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गणपत'मध्ये कृती सेनॉन असेल टायगर श्रॉफची नायिका - कृती सेनॉन काम करणार

टायगर श्रॉफ आणि कृती सेनॉन यांनी आपल्या कारकीर्दीला २०१४ मध्ये 'हिरोपंथी' या चित्रपटापासून एकत्रितपणे सुरुवात केली होती. आता हीच जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार असून कृती सेनॉन 'गणपत' या चित्रपटाची नायिका असणार आहे.

Kriti Sanon
कृती सेनॉन

By

Published : Feb 10, 2021, 12:54 PM IST

मुंबई - टायगर श्रॉफच्या आगामी ‘गणपत’ या चित्रपटाची नायिका कोण असणार याबद्दल उत्सुकता ताणल्यानंतर निर्मात्यांनी कृती सेनॉनची नाव जाहीर केले आहे. या जबरदस्त अॅक्शन चित्रपटात कृती बिनधास्त स्टंट करताना दिसू शकेल.

'गणपत' चित्रपटात कृती सेनॉन काम करणार असून यात तिच्या व्यक्तीरेखेचे नाव काय असेल याचाही खुलासा निर्माता जॅकी भगनानी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर केला आहे. या चित्रपटाती ती जस्सी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे.

टायगर आणि कृती यांनी आपल्या कारकीर्दीला २०१४ मध्ये 'हिरोपंथी' या चित्रपटापासून एकत्रितपणे सुरुवात केली होती. क्विन फेम दिग्दर्शक विकास बहलच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी काम केले होते. या चित्रपटाचीही निर्मिती जॅकी भगनानी यांनी केली होती.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक विकास बहल यांनी यापूर्वी सांगितले होते की आजवर प्रेक्षकांनी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटात काम करण्यास तो उत्सुक आहे. या चित्रपटातील टायगर श्रॉफची भूमिका 'न भूतो न भविष्यति' अशी असल्याचेही तो म्हणाला होता.

टायगरनेही म्हटले होते की चित्रपटातील स्क्रिप्ट, स्केल आणि व्यक्तिरेखा यामुळे 'गणपत' हा चित्रपट यापूर्वी काम केलेल्या सर्व चित्रपटाहून वेगळा आहे.

जॅकी भगनानी निर्मित गणपत हा चित्रपट फ्रेंचायझीचा पहिला चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. या चित्रपटाचे २०२१ च्या मध्यात शूट सुरू होईल. अ‍ॅक्शन पॅक असलेला हा चित्रपट २०२२ मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा - 'हे' आहे जॅकलिन फर्नांडिजच्या फिटनेसचे रहस्य

ABOUT THE AUTHOR

...view details