मुंबई- बुधवारी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोलीतील जांभूळखेडा गावात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात सी- ६० पथकाच्या १५ जवानांना वीरमरण आले. सर्वच स्तरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात असताना आता अभिनेत्री रेणूका शहाणे यांनीदेखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
...त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? रेणूका शहाणेंनी केला सवाल
एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षा कर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न रेणूका शहाणेंनी उपस्थित केला
ज्या सुरक्षा कर्मींचे प्राण गेले त्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षा कर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करत रेणूका शहाणेंनी नक्षलवाद्यांचा आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
सोमवारी मध्यरात्री नक्षलवाद्यांनी दादापूर येथील परिसरात तब्बल २७ वाहनांची जाळपोळ केली. यानंतर बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या घटनेने पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.