मुंबई- कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत नाराज झाले आहेत. असंख्य प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कंगनाने पुन्हा एक ट्विट करत मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे? असे म्हटेल होते. तिने ट्विट केले, 'आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?', असा प्रश्न कंगनाने आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
कंगना म्हणजे, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला - रेणुका शहाणे - कंगना मुंबईत परतणार
कंगना रणौतने मुंबई ही पाक व्यप्त काश्मिरसारखी वाटत असल्याचे म्हणत मुंबई पोलिसांपासून धोका असल्याचे सोशल मीडियावर म्हटले होते. यावर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी प्रतिक्रिया देताना, कंगना म्हणजे, उचलली जीभ लावली टाळ्याला, असे म्हटले आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सोशल मीडियावर कंगनाच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, 'मुंबई हे ते शहर आहे जिथे तुझे बॉलीवूड स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले! अशा परिस्थितीत, या आश्चर्यकारक शहराबद्दल कोणीही तुझ्याकडून नक्कीच काही आदराची अपेक्षा करेल. तू मुंबईची तुलना पीओकेशी कशी केली याबद्दल खूप वाईट वाटते. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला"
यानंतर रेणुका शहाणे यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देऊन कंगनानेही प्रत्युत्तर दिले. कंगनाने लिहिले, 'प्रिय रेणुका जी, एखाद्या जागी असलेल्या प्रशासनावर टीका करणे त्या शहरावर टीका करण्यासारखे कधीपासून झाले. रक्ताच्या तहानलेल्या गिधाडांसारख्या माझ्या देहाचा तुकडा शोधण्याच्या प्रतिक्षेत तुम्हीही आहात काय? मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. '