महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

''छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण नेहमीच प्रेरणादायी'' - Remebaring Shivaji Maharaj is inspirational

''छत्रपती शिवाजी महाराज हा एक शब्द नाही मंत्र आहे. काही शतकानंतरही त्यांच्यापासून प्रेरणाच मिळते. ते जगातील श्रेष्ठ योध्दा आणि आदर्श राजा होते. त्यांचे स्मरण नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे.

Remebaring Shivaji Maharaj
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण नेहमीच प्रेरणादायी

By

Published : Feb 19, 2020, 5:54 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण देशभर चैतन्याचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शहरांसह गावा खेड्यात आज उत्साहाचे वातावरण संचारलंय. याला सिनेक्षेत्रातील लोक कसे अपवाद असतील. रितेश देशमुख, नागराज मंजुळे आणि अजय अतुल त्रयींनी तर आज शिवाजी महाराजांची गाथा पडद्यावर आणायची घोषणा केलीय. तर महानायक अमिताभ बच्चन यांनी शिवजयंती निमित्त नमन केलंय.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केलाय. याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ''छत्रपती शिवाजी महाराज हा एक शब्द नाही मंत्र आहे. काही शतकानंतरही त्यांच्यापासून प्रेरणाच मिळते. ते जगातील श्रेष्ठ योध्दा आणि आदर्श राजा होते. त्यांचे स्मरण नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. छत्रपति शिवाजी महाराज जी जयंती शत् शत् नमन।#ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj.''

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अमिताभ यांनी ट्विट केल्यानंतर त्यांना हजारो युजर्सनी लाईक करीत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details